व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय...

Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय घ्या’

prashant-kishor-sunetra-pawar-meeting-sunil-tatkare-working-style-row-ncp-maharashtra : प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना थेट संदेश, सुनील तटकरेंवर नाराजी

Mumbai: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करायचे असेल, तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

गुरुवारी मुंबईमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची तब्बल सहा तास बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील पक्षसंघटनेची सद्यस्थिती, आगामी निवडणुकांची तयारी आणि संघटनात्मक बदल यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या राजकीय रणनीतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Chandrashekhar Bawankule : खबरदार सावजी मटणावर बोलाल तर….चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला मुंढे यांना सज्जड दम

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी बैठकीत महाराष्ट्रातील नेतृत्व आणि प्रदेश संघटनेच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यातील नेतृत्वाशी प्रभावी समन्वय होत नसल्यास काम करणे कठीण असल्याचे त्यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितले. यापूर्वीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी तीन वेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्या बैठकींमध्ये पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे बदल करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.

मात्र, मागील बैठकींमध्ये सुचवलेल्या बदलांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांसाठी आपण पक्षासोबत काम करावे, अशी अपेक्षा असेल तर प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

chandrashekhar-bawankule : माझी नार्को टेस्ट करा; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचे थेट आव्हान

या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते, तर जय पवार यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला. आता प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात आणि पक्ष संघटनेत कोणते बदल होतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!