व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !

तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !

राहुल गांधींवर टीका नको’ हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Mumbai: महाराष्ट्रातील बेरोजगारी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यावरच सरकारचा भर असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्यांची उत्तरे आयोगानेच द्यावीत, नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे पूर्णवेळ प्रवक्ते म्हणून काम करावे अशी बोचरी टीका सपकाळ यांनी केली आहे.

बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज असताना राहुल गांधी यांच्यावर टीका करणे हा सरकारचा प्रमुख कार्यक्रम झाल्याचे चित्र असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्यावर आयोगाने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची भूमिका मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर किंवा त्यांच्या भूमिकेवर टीका करण्यापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलेले कर्ज, पिकांचे झालेले नुकसान आणि त्यातून निर्माण झालेले आर्थिक संकट यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

‘दुष्काळ जाहीर केल्यानंतर बांधावर जाऊन काय पाहणार?’

राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत नेमकी कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम कधी जमा होणार, याबाबत सरकारने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, असे सपकाळ यांनी म्हटले.

राहुल गांधी यांच्या क्षमतेची किंवा त्यांच्या विचारांची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर सरकारने लक्ष द्यावे, असा टोला सपकाळ यांनी लगावला. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवणे सरकारला शक्य नसेल, तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !

दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना मदतीच्या घोषणांबरोबरच प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस उत्तरे द्यावीत, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

error: Content is protected !!