₹410-crore development plan for Ambadevi–Ekvira Devi temples : प्रारूप आराखड्यावर संस्थान पदाधिकाऱ्यांच्या सूचना; नवरात्रोत्सवानंतर काम सुरू होण्याची शक्यता
Amravati श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी ४१० कोटी रुपयांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर मंदिर संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना जाणून घेण्यासाठी शासनाचे आर्किटेक्ट भिवगडे यांनी सहकाऱ्यांसह नुकतीच दोन्ही मंदिरांची पाहणी केली. त्यानंतर संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत सुमारे दोन तास बैठक घेऊन आराखड्यात सुचविण्यात आलेल्या सुधारणांच्या नोंदी करण्यात आल्या.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने तयार केलेल्या या आराखड्यात मंदिरांच्या गर्भगृहाला कोणताही धक्का न लावता परिसराचे सौंदर्यीकरण, नूतनीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अमरावतीतील दोन्ही मंदिर परिसराचा नागपुरातील श्री कोराडी देवी-अंबा महालक्ष्मी मंदिर परिसराच्या धर्तीवर विकास करण्याचे नियोजन आहे.
मार्चपासून मंदिर विकास आराखड्याचा प्रारूप चर्चेत आहे. संस्थान पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या सुधारणांशी वास्तुविशारदांनी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात आले. अंतिम मंजुरीनंतर नवरात्रोत्सवानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वप्रथम आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
High court decision : पिणाऱ्यांना ‘जोर का झटका’! रम-व्हिस्कीच्या चवीमागचं गुपित उघड !
आराखड्यात मंदिर परिसराचे सुशोभीकरण, नूतनीकरणासह भाविकांसाठी अधिक आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंदिरांच्या ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाला धक्का न लावता विकासकामे करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
The Cockroach Janta Party : एबीसीडी शिकायला दोन लाख रुपये?, कॉक्रोच जनता पार्टीने घेतलं मनावर
“श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण व नूतनीकरणासाठी ४१० कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात आवश्यक दुरुस्त्यांच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. एमएसआयडीसीच्या आर्किटेक्ट व वास्तू अभियंत्यांनी दोन्ही मंदिरांची पाहणी केली आहे,” अशी माहिती श्री अंबादेवी संस्थानचे सचिव डॉ. जयंत पांढरीकर यांनी दिली.








