व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : रोहित पवार फक्त भ्रम निर्माण करतात, निवडणूक यंत्रणेवरील टीका...

Chandrashekhar bawankule : रोहित पवार फक्त भ्रम निर्माण करतात, निवडणूक यंत्रणेवरील टीका संविधानविरोधी

Criticism of the election machinery is anti-constitutional, says Chandrashekhar Bawankule, targeting Rohit Pawar : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला समाचार

Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे सातत्याने नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेविरोधात वक्तव्ये करणे हे संविधानविरोधी आहे, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

बावनकुळे म्हणाले की, एसआयआरच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. बूथ लेव्हल अधिकारी काय काम करत आहेत, यावर सर्व पक्षांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. एकही पात्र मतदार मतदारयादीतून सुटू नये, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. विनाकारण खोटे आरोप करण्याऐवजी प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेला प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची गरज आहे.

Ramdas Athavale: पेपरफुटीविरोधात लढा देणारे अभिजित दीपके आरपीआयमध्ये येणार? रामदास आठवले यांची ऑफर

वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या अवमानावर बोलताना बावनकुळे म्हणाले, हा भारताच्या संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा अपमान आहे. असा अवमान करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रभावनेच्या विषयात कोणताही अवमान सहन केला जाणार नाही. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mallikarjun Kharge : खरगे यांच्या सभेच्या मंचाच्या शुद्धीकरणाचा काँग्रेसकडून निषेध

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचाही बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु केवळ प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करणे योग्य नाही. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी मोठे योगदान दिले असून पक्षाने त्यांना सर्वोच्च सन्मान दिला. जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो. एखादी व्यक्ती हयात नसताना तिच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करून तिच्या प्रतिमेला गालबोट लावणे दुर्दैवी आहे. चव्हाण यांनी आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

error: Content is protected !!