व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj Jarange : शिंदेंचा मेळावा उधळू, काही गडबड झाल्यास जबाबदार राहणार नाही...

Manoj Jarange : शिंदेंचा मेळावा उधळू, काही गडबड झाल्यास जबाबदार राहणार नाही जरांगेंचा थेट फोन !

manoj-jarange-patil-on-eknath-shinde-parbhani-maratha-reservation-sanjay-jadhav : मराठा आरक्षणावरून पुन्हा वातावरण तापले

Mumbai : मराठा समाजाच्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी परभणीत होणारा शेतकरी मेळावा उधळून लावण्याचा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मराठा समाजातील काही उमेदवारांना देण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने नुकतीच अवैध ठरवली आहेत. या निर्णयामुळे मनोज जरांगे संतप्त झाले असून त्यांनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ११ तारखेपर्यंत सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा १२ सप्टेंबर रोजी थेट मंत्रालयावर धडक मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

या संपूर्ण परिस्थितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जरांगे यांनी थेट जबाबदार धरले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे आपल्याच समाजातील लोकांची जात प्रमाणपत्रे अवैध ठरवत असल्याचा आरोप करत, त्यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या मेळाव्याला मराठा बांधवांनी अजिबात जाऊ नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

Sanjay Raut : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे घाबरले!

दरम्यान, मनोज जरांगे यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना थेट फोन करून हा मेळावा रद्द करण्याची मागणी केली. “मराठ्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता आणि शेवटी त्यांचाच घात करता. हा मेळावा रद्द करा. मेळाव्यात काही गडबड झाली किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही,” असा इशारा जरांगे यांनी फोनवरून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Mohan Bhagwat On Muslim : ‘भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू कदाचित हिंदू नसेल’

जरांगे यांच्या या थेट इशाऱ्यानंतर प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले असताना, मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी मंडळी काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!