व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Arvind Sawant : इमारत देखणी असून चालत नाही, आरोग्य सेवा महत्त्वाची; अरविंद...

Arvind Sawant : इमारत देखणी असून चालत नाही, आरोग्य सेवा महत्त्वाची; अरविंद सावंतांचा सरकारला टोला

Buildings alone do not ensure healthcare; quality health services matter, says Arvind Sawant : व्हेंटिलेटरच सरकारला व्हेंटिलेटरवर आणत आहे, डफरीन अग्निकांडावरून आरोग्य यंत्रणेवर निशाणा

Amravati डफरीन रुग्णालयातील Dufferin Hospital fire incident व्हेंटिलेटर स्फोटात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘व्हेंटिलेटरच सरकारला व्हेंटिलेटरवर आणत आहे,’ असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला. घटनेच्या सातव्या दिवशी त्यांनी डफरीन रुग्णालयाला भेट देत पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांची पाहणी केली.

सावंत यांनी ही घटना अत्यंत क्लेषदायी असल्याचे सांगितले. राज्यात यापूर्वीही रुग्णालयांमध्ये अशा दुर्घटना घडल्या आहेत. तरीही शासन आरोग्य सेवांबाबत गंभीर नसल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘इमारत चांगली, पण आरोग्य सेवा महत्त्वाची’

पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख असलेल्या सावंत यांनी रुग्णालयाच्या इमारतीसह विविध विभागांची पाहणी केली. इमारत, मांडणी आणि फर्निचर चांगले असले, तरी रुग्णालयाचा आत्मा असलेली आरोग्य सेवाच सक्षम नसेल तर या सुविधांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar : १३४ विद्यार्थी यूपीएससी उत्तीर्ण झाले, पण ओबीसी असल्याने डावलले

चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुरेसे डॉक्टर, परिचारिका आणि पूरक कर्मचारी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या दिमतीला असलेली वैद्यकीय यंत्रसामग्रीही योग्य दर्जाची आणि क्षमतेची असणे गरजेचे आहे. व्हेंटिलेटरला स्टॅबिलायझर नसल्यामुळे स्फोट झाला असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे सावंत म्हणाले.

‘एल-वन’ धोरणावरही सवाल

सरकारच्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेवरही सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला. रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी केवळ सर्वात कमी दराची निविदा म्हणजेच ‘एल-वन’ या निकषावर खरेदी करू नये, असे ते म्हणाले.

रुग्णालयातील सेवा दर्जेदार ठेवायची असेल, तर तेथे वापरली जाणारी यंत्रसामग्रीही दर्जेदार असणे आवश्यक आहे. या संपूर्ण विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Amravati Congress : काँग्रेसचा शक्तिप्रदर्शनाचा सूर; सत्ता नसतानाही कार्यकर्ता काँग्रेससोबत असल्याचा दावा

वैद्यकीय अधीक्षकांकडून घेतली माहिती

सावंत यांनी सुरुवातीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांच्याकडून २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या अग्निकांडाचा घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, शहरप्रमुख प्रवीण हरमकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!