Councillor assaulted at Hiwarkhed Municipal Council; CCTV room sealed by police : राजकीय वादातून लाकडी दांडक्याने हल्ल्याचा आरोप; दोषींवर कारवाईची मागणी
Akola हिवरखेड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवसेनेचे गटनेते रवी घुंगड आणि एका नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली. राजकीय वादातून नगराध्यक्षांचा मुलगा, पती व अन्य नातेवाइकांनी लाकडी दांडक्याने पाठीमागून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिवरखेड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेचा नेमका घटनाक्रम स्पष्ट होण्यासाठी हिवरखेड नगरपरिषदेतील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष पोलिसांनी सील केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेची सत्यता पडताळून संबंधितांची भूमिका निश्चित केली जाणार आहे.
नगरपरिषद कार्यालयात पाठीमागून लाकडी दांडक्याने अचानक हल्ला करण्यात आल्याचा आरोप रवी घुंगड यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींवर कार्यालयाच्या परिसरात अशा प्रकारे हल्ला होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा गनिमी कावा; ‘मुंबई चला’च्या आदेशाने महायुतीचे टेन्शन वाढले!
या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तपासाअंती नेमके दोषी कोण, हे स्पष्ट होणार आहे.








