व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी पुढाकार, म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत...

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा बल्लारपूरच्या १ हजार घरकुलांसाठी पुढाकार, म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

sudhir-mungantiwar-ballarpur-1000-gharkul-chandrapur-2004-gharkul-mhada : चंद्रपूरच्या २,००४ घरकुलांचा घेतला आढावा, परिसरातील रस्ते, मूलभूत सुविधांबाबतही दिले निर्देश

Chandrapur : सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुलांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी बल्लारपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याबाबत चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच नवीन चंद्रपूर येथील यापूर्वी मंजूर झालेल्या २,००४ घरकुलांच्या प्रकल्पाचा आढावा घेतला. चंद्रपूर म्हाडा परिसरातील रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांना आवश्यक सूचना केल्या.

नागपूर येथील म्हाडा कार्यालयात झालेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील म्हाडाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नवीन चंद्रपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर २,००४ घरकुलांच्या प्रकल्पाची सद्यस्थिती, पुढील कार्यवाही आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळण्याबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बल्लारपूर शहरातील गरजू कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. बल्लारपूरमधील घरकुलांची गरज लक्षात घेऊन या संदर्भातील प्रस्ताव सादर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे बल्लारपूरमधील गरजू कुटुंबांसाठी घरकुलांचा प्रश्न पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलिसांना ३०.५२ कोटींचे बळ !

दरम्यान, चंद्रपूर येथील म्हाडा परिसरात घरकुले उपलब्ध होत असतानाच नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा मिळणेही महत्त्वाचे असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. परिसरातील रस्त्यांची अवस्था तसेच अन्य मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत रस्ते आणि आवश्यक सुविधांची कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश त्यांनी म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांना दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी मुनगंटीवार यांनी यापूर्वीही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. नवीन चंद्रपूर येथील २,००४ घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर बल्लारपूरमधील १ हजार घरकुलांच्या प्रस्तावाबाबतही चर्चा करून तो पुढे नेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

Public Protests : अस्वस्थ महाराष्ट्र, जनता रस्त्यावर, सरकार नेमके कुठे चुकतेय?

घरकुल हा केवळ निवाऱ्याचा प्रश्न नसून कुटुंबाच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्ण जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे घरकुल प्रकल्पांसोबतच त्या परिसरात रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही मुनगंटीवार यांनी भर दिला. चंद्रपूर आणि बल्लारपूरमधील घरकुलांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून पात्र आणि गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

error: Content is protected !!