व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Teachers constituency elections : पक्षाने तिकीट दिले नाही तरी मैदानात उतरणार!

Teachers constituency elections : पक्षाने तिकीट दिले नाही तरी मैदानात उतरणार!

Shrikant Deshpande announces he may contest the Amravati Division Teachers’ Constituency election independently : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडेंची घोषणा

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागणार असून, पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी निवडणूक लढविणारच, अशी ठाम घोषणा माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे. बुलडाणा दौऱ्यावर असताना ५ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी नरेंद्र गुल्हाने, उभरहांडे आणि सतीश बिल्लारी उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून बुलडाण्याचे प्रा. डी. एस. लहाने यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून, इतर इच्छुक उमेदवारांनीही मतदारांशी संपर्क वाढविला आहे.

देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जुनी पेन्शन योजना आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठीही प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम केले असल्याचा दावा त्यांनी केला.

Sanjay Gaikwad : ‘बाई, बापासारखं शरीर कुठून आणणार?’; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद

“पक्षाकडून उमेदवारी मिळणे हा वेगळा विषय आहे; मात्र निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे,” असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती मोठी असून अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे उमेदवारांना पाचही जिल्ह्यांत व्यापक जनसंपर्कासह संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे.

२०२० मधील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या निवडणुकीत किरण सरनाईक विजयी झाले होते. त्यामुळे देशपांडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास शिक्षकांमधील त्यांचा संपर्क, मागील निवडणुकीची पार्श्वभूमी आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Youth Congress, RSS : संघ मुख्यालयासमोर युवक काँग्रेसची धडक; मनुस्मृतीची प्रत जाळून जोरदार निदर्शने, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

बुलडाणा जिल्ह्यात शिक्षक भारतीकडून सुरेश देवकर, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रा. डी. एस. लहाने हे इच्छुक असून, दोघांनीही आपापल्या पद्धतीने मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. दोन्ही इच्छुक उमेदवार बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.

मात्र, अन्य जिल्ह्यातील असतानाही श्रीकांत देशपांडे यांनी बुलडाण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढविण्याची भूमिका सर्वप्रथम स्पष्ट केल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक चर्चेत त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसताना देशपांडे यांच्या घोषणेमुळे आता शिवसेनेची पुढील भूमिका काय राहते, याकडे शिक्षक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!