Youth congress protest in front of RSS headquarter, burns Manusmriti : कार्यकर्त्यांची धरपकड, आंदोलनामुळे रेशिमबाग परिसरात तणाव
Nagpur हजारो वर्षांची विषमता नको, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हवी असा नारा देत नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी आणि मनुस्मृतीच्या विचारसरणीविरोधात आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयासमोर मनुस्मृतीची प्रत जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करत गुन्हे दाखल केले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर हल्द्वानी येथील रामलीला मैदानाचे कथितरित्या शुद्धीकरण करण्यात आले होते. या घटनेतून दलित समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून संघ आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मनुस्मृती नव्हे, भारतीय संविधान हाच देशाचा खरा आधार आहे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर हादरवून सोडला.
Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद
या आक्रमक आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत कातुरे, सागर चव्हाण, अभिजित ठाकरे, डॉ. मेहुल आडवानी, राज संतापे, धीरज धकाते, नुपूर मते, विक्की नरेकर, आयुष राऊत आणि आदित्य राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी संघ व भाजपच्या विचारसरणीविरुद्ध हा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असा ठाम निर्धार युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे.








