manoj-jarange-patil-maratha-morcha-mumbai-route-september-2026 : १५ ला अंतरवाली सराटीतून प्रस्थान, १९ सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईच्या दिशेने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. अंतरवाली सराटी येथे शनिवारी झालेल्या सभेत जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची तारीख आणि मोर्चाच्या मार्गाची घोषणा केली. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीतून मराठ्यांचा महासागर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनुसार, १५ सप्टेंबर रोजी मोर्चाचा पहिला मुक्काम पाटोदा, बीड येथे असेल. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा, अहिल्यानगर, १७ सप्टेंबर रोजी हडपसर, पुणे आणि १८ सप्टेंबर रोजी खोपोली, रायगड येथे मोर्चाचा मुक्काम असेल. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सकाळी १० वाजता आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.
१५ सप्टेंबर – अंतरवाली सराटीतून सकाळी ११ वाजता प्रस्थान; मुक्काम पाटोदा, बीड. १६ सप्टेंबर – मुक्काम श्रीगोंदा, अहिल्यानगर. १७ सप्टेंबर – मुक्काम हडपसर, पुणे१८ सप्टेंबर – मुक्काम खोपोली, रायगड. १९ सप्टेंबर – मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात
Amravati Mayour : महापौरांच्या भावांचा नूडल्सचा कारखाना; एफडीएची कारवाई, दोन्ही परवाने निलंबित
दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे मराठा मोर्चा नियोजित वेळापत्रकानुसार मुंबईत पोहोचणार का आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थिती कशी हाताळली जाणार, याकडे आता राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईतील आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ करू नका, वाहनं शांतपणे चालवा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
“मुंबईतून आरक्षण घेऊन येईपर्यंत शांततेत आंदोलन करायचे आहे. आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमचा हक्क मिळवायचा आहे,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चाची तयारी कशी होते, मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो आणि मुंबईत पोहोचल्यानंतर प्रशासन या आंदोलनाला कशा पद्धतीने हाताळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
___








