व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav balasaheb thackeray : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; ठाकरे...

Uddhav balasaheb thackeray : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; ठाकरे गटाची मागणी

Provide farmers with blanket assistance of ₹50,000 per hectare; Uddhav Thackeray-led Shiv Sena demands : शिवसेनेचा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सहा ठिकाणी आक्रोश मोर्चा

Akola गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपू लागली असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचा दावा करीत, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत सहा ठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले की, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत मोर्चाच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. आतापर्यंत शंभर गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, शासनाच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला.

Vidarbha Farmers : पावसाअभावी पिके संकटात; ‘पालकमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी’

पश्चिम विदर्भावर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

अकोला जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य भवन येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सुमारे दहा हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा आमदार देशमुख यांनी केला. वाशिम येथे २१ सप्टेंबर, यवतमाळ येथे २३ सप्टेंबर, अमरावती येथे २८ सप्टेंबर, बुलढाणा येथे २९ सप्टेंबर, तर खामगाव येथे ३० सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Amravati Municipal corporation : अमरावतीकरांवर वाढीव मालमत्ता कराचे ओझे कायम!

या आहेत प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.
आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे.
सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा.
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांचे नियोजन करावे.

error: Content is protected !!