Shetkari Jagar Manch : शेतकरी करणार रात्रभर आंदोलन !

Farmers of Akola will protest at Night for complete debt relief : शेतकरी जागर मंचाचा हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी लढा

Akola जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून शेतकरी जागर मंचाने संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली आहे. त्यासाठी २९ जानेवारी २०२५ पासून दररोज रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत जागर आंदोलन होणार आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतमाल हमीभाव कायदा लागू करण्याची मागणीही मंचाने केली आहे. या प्रमुख मागण्यांसाठी मंचाच्यावतीने विशेष जागर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय परंपरेनुसार, अनीती नष्ट करण्यासाठी आणि सत्याचा विजय सुनिश्चित करण्यासाठी जागर केला जातो. या संघर्षात कष्टकऱ्यांचा विजय होण्यासाठी शेतकरी संघटित होत आहेत.

Nitin Gadkari : राजकारणात येण्याची घाई नसावी, हे विद्यार्थी परिषदेने शिकवले !

सरकार सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे राबवून हमीभाव नाकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला केवळ ३७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अशात शेतकरी हताश झाले आहेत. सरकार मात्र शांतपणे दुर्लक्ष करत आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मागे घेताना सरकारने हमीभाव कायदा लवकरच लागू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पंजाबमधील खानौरी सीमेजवळ गेल्या वर्षभरापासून शेतकरी नेता जगजितसिंग उग्गेवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारच्यावतीने त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही!’

१३ फेब्रुवारी २०२५ रोजी या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही सरकार हमीभाव कायद्याबाबत उदासीन आहे. दुसरीकडे, शेतमालाचे बाजारभाव दिवसेंदिवस घसरत आहेत. या परिस्थितीत आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असं जागर मंचाने म्हटलं आहे.

रात्रीच आंदोलन का?
शेतकरी जागर मंचाने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, रात्र ही नव्या पहाटेची नांदी असते. निवडणुकीपूर्वी सरकारने ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. सोयाबीनचा बाजारभाव गेल्या दहा वर्षांपूर्वी ज्या पातळीवर होता, तिथेच स्थिरावला आहे, तर यंदा उत्पादनही विक्रमी घसरले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून सरकारने तत्काळ मदतीसाठी पुढे यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.