Talk of Navneet Rana’s candidature causes unease among local aspirants : नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या चर्चेने स्थानिक इच्छुकांमध्ये अस्वस्थता; पक्षांतर्गत कुजबुज वाढली
Amravati आगामी लोकसभा निवडणूक २०२९ मध्ये होणार असली, तरी अमरावती लोकसभा मतदारसंघ भविष्यात खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यास भाजपमधील स्थानिक जुने-जाणते नेते आणि इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वतःला संभाव्य उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केल्याची चर्चा पक्षाच्या काही स्थानिक निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे.
‘पक्षाचा निर्णय अंतिम असतो. आधीच एकतर्फी रणशिंग फुंकून उमेदवारी पक्की होत नाही. राजकारणात पुढे घोडे मैदान आहेच,’ अशी कुजबुज भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील सामाजिक, राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुकीतील आरक्षणाची स्थिती यावर उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असला, तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्याच पातळीवर होणार आहे.
Manoj Jarange : जरांगे म्हणतात,“आरक्षण महत्त्वाचं, दौरा नाही”
दरम्यान, नवनीत राणा यांचे नाव चर्चेत असतानाच भाजपमधील स्थानिक इच्छुकांकडूनही मतदारसंघावर दावा करण्याची तयारी सुरू झाल्यास पक्षांतर्गत स्पर्धेला धार येऊ शकते. परिणामी, आगामी काळात राणा विरुद्ध स्थानिक भाजप नेते असा संभाव्य संघर्ष चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारीबाबत सध्या कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.








