व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांचा धडाडीचा ‘पॉवर इम्पॅक्ट’; राजोलीला स्वतंत्र वीज वितरण केंद्र मंजूर*

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांचा धडाडीचा ‘पॉवर इम्पॅक्ट’; राजोलीला स्वतंत्र वीज वितरण केंद्र मंजूर*

Independent power distribution centre approved for Rajoli on Sudhir Mungantiwar’s initiative : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने राजोलीला स्वतंत्र वीज वितरण केंद्र मंजूर

Chandrapur नागरिकांच्या प्रश्नांना आपला प्रश्न मानून ते मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे. राजोली व परिसरातील नागरिकांच्या वीजविषयक अडचणी अधिक जलद आणि स्थानिक पातळीवर सोडविता याव्यात, यासाठी मूल शहर व मूल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन राजोली वीज वितरण केंद्र निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्राद्वारे ही माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आ. मुनगंटीवार यांनी माननीय मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

राजोली व परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या, नवीन वीज जोडणी, तांत्रिक अडचणी, देखभाल-दुरुस्ती तसेच इतर सेवांसाठी मूल येथील कार्यालयावर अवलंबून राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर राजोली येथे स्वतंत्र वीज वितरण केंद्र निर्माण करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे सातत्याने मांडली होती. या पाठपुराव्याची दखल घेत मूल शहर व मूल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन राजोली वीज वितरण केंद्र कार्यालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी आ. मुनगंटीवार यांना पाठविलेल्या पत्रातून ही बाब स्पष्ट केली आहे.

Graduate constituency election: नागपूर पदवीधर मतदारसंघ: सोले लागले कामाला, कोहळे म्हणतात मीच अधिकृत उमेदवार; भाजपच्या उमेदवारीवरून वादाची ठिणगी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राजोली येथे नवीन वीज वितरण केंद्राची निर्मिती होत असून, या स्वतंत्र केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना वीज वितरणाशी संबंधित तक्रारी व समस्या स्थानिक पातळीवरच मांडता येणार आहेत.वीजपुरवठ्यातील अडचणी, देखभाल-दुरुस्ती, नवीन वीज जोडण्या तसेच ग्राहक सेवेशी संबंधित प्रश्नांच्या निवारणाला यामुळे अधिक गती मिळणार आहे. नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी दूरवर जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवरच त्यांच्या अडचणींचे जलद निराकरण व्हावे, हा आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामागील प्रमुख उद्देश होता.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत, ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित विभाग आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीची ठळक ओळख आहे. राजोली वीज वितरण केंद्राला मिळालेली मंजुरी हे त्याच सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित असून, नागरिकांच्या प्रश्नांना मिळालेल्या या निर्णयातून त्यांच्या पुढाकाराची ठोस पावती मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!