व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar, Rahul Bondre : राहुल गांधींच्या ‘डरो मत’ मंत्रानंतर राहुल बोंद्रेंची...

Vijay Wadettiwar, Rahul Bondre : राहुल गांधींच्या ‘डरो मत’ मंत्रानंतर राहुल बोंद्रेंची माघार; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

After Rahul Gandhi’s ‘Daro Mat’ Mantra, Rahul Bondre Retreats; Vadettiwar Makes Serious Allegation : फोन आल्यानंतर पक्षांतर टाळत काँग्रेसमध्येच थांबण्याचा मोठा निर्णय

Nagpur बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे उठलेले राजकीय वादळ शेवटी राहुल गांधींच्या एका थेट फोन कॉलमुळे शमले आहे. भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण झालेली असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वतः फोनवरून संवाद साधत “डरो मत” असा मंत्र दिला, ज्यानंतर बोंद्रे यांनी पक्षांतर टाळत काँग्रेसमध्येच थांबण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दोन वेळा आमदार राहिलेल्या राहुल बोंद्रे यांच्या काही शैक्षणिक संस्थांवर अलीकडेच धाडी पडल्या होत्या. त्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी आणि यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखवून त्यांच्यावर भाजप प्रवेशासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. बोंद्रे यांनी स्वतःही भाजप प्रवेशाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सोमवारी राहुल गांधी यांनी त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून भाजपच्या दबावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला. गांधींच्या आवाहनाला मान देऊन बोंद्रे यांनी माघार घेतली असून, ते राहुल गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होत असल्याचे समजते.

Vidhan Parishad election : पदवीधरचा ‘गढ’ परत मिळवण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच; वंजारींविरुद्ध ‘गडकरी-फडणवीस’ कोणाला उतरवणार

या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला. बोंद्रे यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या, केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवून प्रवेशासाठी दबाव तंत्र वापरण्यात आले, असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. ऐन प्रवेशाच्या तोंडावर राहुल गांधींच्या एका फोन कॉलमुळे रणनीती फसल्याने भाजपची मोठी राजकीय नाचक्की झाल्याचे मानले जात आहे, तर बुलढाण्यातील काँग्रेसमधील मोठा अंतर्गत भूकंप टळला आहे.

error: Content is protected !!