व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : मी व्यस्त होतो म्हणून, नाहीतर राहुल बोंद्रे शिवसेनेत येणार...

Sanjay Gaikwad : मी व्यस्त होतो म्हणून, नाहीतर राहुल बोंद्रे शिवसेनेत येणार होते; संजय गायकवाडांचा दावा

Rahul Bondre would have joined Shivsena, claims Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याची माहिती, लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त विधान

Buldhana राहुल बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे. बोंद्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटही झाली होती. मात्र, आपण १५ दिवस कर्नाटक दौऱ्यावर होतो. त्यानंतर २० दिवस जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. याच काळात राहुल बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात नुकतीच शेतकरी कर्जमाफी झाली असून, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार आहे. अशा परिस्थितीत सरकारनेही पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, देश आणि शेतकरी वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण आपला एक महिन्याचा संपूर्ण पगार देणार असल्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. मुख्य सचिवांपासून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत, तसेच सर्व आमदार आणि शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा किंवा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Uddhav Balasaheb Thackeray : दुष्काळ जाहीर करा; अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करू

शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात असून, यंदा त्यांना आनंदात दिवाळी साजरी करता येणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनीही यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजारांची मदत द्या

दुष्काळाच्या परिस्थितीबाबत बोलताना गायकवाड म्हणाले की, साधारणपणे ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र, त्यापूर्वी तीन टप्प्यांत होणारे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Teachers constituency election : महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर निर्बंध; आमसभेवरही परिणाम?

पुढील महिन्यात राज्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे शक्य नसले, तरी किमान ५० हजार रुपये मदत सरकारने तातडीने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश असून, पालकमंत्री जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष देत असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!