व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Balasaheb Thackeray : दुष्काळ जाहीर करा; अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग...

Uddhav Balasaheb Thackeray : दुष्काळ जाहीर करा; अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करू

Declare drought or we will shut down the Samruddhi Expressway from October 5, Shivsena warns : शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात आमदार नितीन देशमुख यांचा शासनाला इशारा

Akola अकोला जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही अटी-निकषांशिवाय कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख Nitin Deshmukh यांनी दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोपप्रसंगी आमदार देशमुख बोलत होते.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद आदी पिकांचे नुकसान झाल्याचा दावा मोर्चाच्या आयोजकांनी केला. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, संभाव्य पाणी व चारा टंचाईवरही शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही आमदार देशमुख यांनी केला.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

मोर्चाच्या माध्यमातून कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय पीकविम्याचे पूर्वीचे चार ट्रिगर पूर्ववत करून नुकसानभरपाई द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

सिंचन सुविधा असलेल्या भागात कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी २४ तास कर्मचारी उपलब्ध करावेत. नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. पुनर्गठन केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

Teachers constituency election : महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर निर्बंध; आमसभेवरही परिणाम?

स्वराज्य भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

आक्रोश मोर्चाला स्वराज्य भवनाच्या प्रांगणातून सुरुवात झाली. तेथून शहीद मदनलाल धिंग्रा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह आणि पंचायत समिती मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. मोर्चानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

सुकलेले सोयाबीन हातात घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन

मोर्चाच्या मार्गावर भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले होते. बैलगाड्यांवर प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. दिंडीच्या गजरात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. महिला व पुरुष शेतकऱ्यांनी हातात सुकलेले सोयाबीन घेऊन पिकांच्या नुकसानीचे चित्र प्रशासनासमोर मांडले.

उद्योगपतींच्या कर्जमाफीचा मुद्दा

मोर्चाला संबोधित करताना आमदार नितीन देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणावर प्रश्न उपस्थित केला. बड्या उद्योगपतींच्या कर्जाबाबत सवलती दिल्या जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अटी व निकष लावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पीककर्जाच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Teachers constituency election : ‘पैठणी पॅटर्न’ने गाजली होती २०२०ची निवडणूक; यंदाचे प्लानिंग काय?

मोर्चाला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, बुलढाण्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, ज्येष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार आदींनी संबोधित केले.

मोर्चात माजी आमदार संजय गावंडे, सागर पुरी, वैशाली घोरपडे, प्रा. माया म्हैसने, डॉ. सरिता वाकोडे, प्रा. संतोष हुसे, विकास पागृत, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, चंदू तिवारी, अतुल पवनीकर, संजय शेळके, भूषण भिरड, बबलू देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!