व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण नागपूर कराराची मूर्तिजापुरात होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा

नागपूर कराराची मूर्तिजापुरात होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा

७३ वर्षांत विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

Akola नागपूर कराराला ७३ वर्षे उलटूनही विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी मूर्तिजापूर येथे नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप (माजी आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समितीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विदर्भातील १२० तालुक्यांत एकाच वेळी नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्याच्या आंदोलनाचा हा भाग होता.

‘दुष्काळ जाहीर केल्यानंतर बांधावर जाऊन काय पाहणार?’

आंदोलकांनी नागपूर कराराच्या प्रती जाळत ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ‘नागपूर कराराचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या. विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती हाच कायमस्वरूपी मार्ग असल्याचा दावा आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी; अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !

या आंदोलनात जिल्हा समन्वयक अरविंद तायडे, रामचंद्र तायडे, विजय लोडम, प्रा. सुधाकरराव गौरखेडे, गुलाबराव पाटील म्हसाये, श्रीकृष्ण कोळसकर, बाळासाहेब तायडे, विलासभाऊ नसले, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब खांडेकर, शिवदास राऊत, प्रदीप डांगे, अॅड. वामनराव वानखडे, सचिन तांबडे, रामू भगत, सुनीता गावंडे, सुनीता इंगळे, सुधाकर गोंडसे यांच्यासह शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि विदर्भ समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

error: Content is protected !!