व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ऊर्जानगरच्या नागरिकांनी मागणी केली; आ. सुधीर मुनगंटीवारांनी मंजुरी मिळवून दिली! शेडचा मार्ग...

ऊर्जानगरच्या नागरिकांनी मागणी केली; आ. सुधीर मुनगंटीवारांनी मंजुरी मिळवून दिली! शेडचा मार्ग अखेर मोकळा

स्थानिकांची गरज ओळखून आ. मुनगंटीवारांचा पुढाकार; पाठपुराव्याच्या जोरावर कामाला मिळाले मूर्त स्वरूप

Chandrapur: जनतेने मागणी केली,प्रश्न समोर आला आणि तो प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. आश्वासन देऊन थांबण्याऐवजी मागणीला प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला. नागरिकांची मागणी प्रत्यक्षात उतरली असून ऊर्जानगरच्या शेड बांधकामाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

ओम शिव गणेश मंडळ परिसरातील शासकीय जागेवर शेड उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. परिसराची गरज आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी ६ जून २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत या कामाची ठोस शिफारस केली. मागणी करून ती फाईलच्या ढिगाऱ्यात पडून राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणेकडील प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दणका! एमपीएससी सचिवांची बदली; अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम!

या पाठपुराव्याला अखेर यश आले असून २० सप्टेंबर २०२६ रोजी शेड बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेली मागणी आता प्रत्यक्ष कामाच्या दिशेने निर्णायक पाऊल पुढे गेली आहे.जनतेने मागणी करायची आणि लोकप्रतिनिधींनी ती प्रशासनाच्या दारात नेऊन सोडायची, एवढ्यावर विषय थांबत नाही; मागणीचे कामात रूपांतर होईपर्यंत पाठपुरावा करणे हीच खरी लोकप्रतिनिधित्वाची कसोटी आहे. ऊर्जानगरच्या शेडच्या मंजुरीच्या निमित्ताने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

अमरावतीची लेक, अकोल्याची सून आता काँग्रेसच्या मैदानात

स्थानिक नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देत त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने ऊर्जानगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांची मागणी, आमदारांचा पुढाकार आणि पाठपुराव्याला मिळालेले यश या त्रिसूत्रीतून ऊर्जानगरच्या शेडच्या कामाला आता प्रत्यक्ष मंजुरीचे बळ मिळाले आहे.

error: Content is protected !!