व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र तपासणीसाठी गेलेल्या दक्षता पथकासह आमदार पोहोचले पोलीस ठाण्यात!

तपासणीसाठी गेलेल्या दक्षता पथकासह आमदार पोहोचले पोलीस ठाण्यात!

फॉर्महाऊसमधील वीज वापर तपासणीवरून वाद; गैरसमजातून प्रकार घडल्याची ठाणेदारांची माहिती

Akola मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांच्या ग्रामीण भागातील फॉर्महाऊसमध्ये वीज वापराच्या तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या दक्षता पथकासोबत बुधवारी रात्री वादाची परिस्थिती निर्माण झाली. तपासणीदरम्यान समाधानकारक चर्चा न झाल्याने आमदार पिंपळे हे समर्थकांसह दक्षता पथकाला घेऊन मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे ठाणेदार दीपक महाडीक यांनी सांगितले.

महावितरणचे भरारी पथक बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आमदार पिंपळे यांच्या पळसोडा रोडवरील फॉर्महाऊसवर वीज वापराची तपासणी करण्यासाठी पोहोचले. पथक कोणाच्या आदेशाने आले, अशी विचारणा आमदार पिंपळे यांनी केल्याची माहिती आहे. त्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासणीसाठी आल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या मातीत नाना पाटेकर यांच्या‘नाम’चा जलसंवर्धनाचा हात

लेखी आदेशावरून विचारणा

वरिष्ठांचा लेखी आदेश नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार पिंपळे आणि त्यांच्या समर्थकांनी पथकाला फॉर्महाऊसमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर दोन्ही पक्ष मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचले.

पोलिस ठाण्यात दक्षता पथकातील सदस्यांनी ठाणेदार दीपक महाडीक यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगितला. दुसरीकडे, आमदार पिंपळे यांच्या समर्थकांनी पथक विनापरवानगी आल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. पोलिस उपनिरीक्षक वानखडे यांनी पथकातील सदस्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल नाही

याबाबत ठाणेदार दीपक महाडीक यांच्याशी संपर्क साधला असता, दक्षता पथक आणि आमदारांच्या समर्थकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

प्यारे खान यांचा ‘तो’ दौरा पूर्णपणे अधिकृत, बदनामी कराल तर कारवाई करू, आयोगाचा इशारा

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी आमदार हरिष पिंपळे तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही

error: Content is protected !!