व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अर्ज माघारीच्या ऐन मोक्यावर माजी आमदार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे वाढले टेंशन

अर्ज माघारीच्या ऐन मोक्यावर माजी आमदार ‘नॉट रिचेबल’; भाजपचे वाढले टेंशन

अनिल सोलेंच्या भूमिकेमुळे सुधाकर कोहळेंची धाकधूक वाढली

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपपुढील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बंडाचे निशान फडकवणारे पक्षाचे माजी आमदार अनिल सोले आता अर्ज मागे घेण्याच्या ऐन मोक्यावर ‘नॉट रिचेबल’ झाल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, सोले यांच्या या ‘सायलेंट स्ट्राईक’मुळे भाजप नेतृत्वाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

बंडखोरी शमवण्यासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भाजपच्या कोअर समितीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनीच सोले यांच्या बंडखोरीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. बैठकीदरम्यान नितीन गडकरी यांनी सोले यांना थेट संपर्क साधण्यास सांगितले; मात्र, त्यांचा फोन बंदच येत असल्याने नेत्यांचा निरुपाय झाला.

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अनिल सोले यांची समजूत काढण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, सोले नागपुरात असूनही त्यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेण्याचे मुद्दाम टाळल्याची चर्चा रंगली होती. आता थेट संपर्क यंत्रणाच बंद करून त्यांनी पक्षाला ठणकावून सांगितले आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

शिक्षक मतदारसंघाच्या यादीतच ‘बोगस शिक्षक’!

यापूर्वी याच मतदारसंघातून विजयी झालेल्या अनिल सोले यांचे गेल्या निवडणुकीत पक्षाने तिकीट कापले होते, ज्याचा फटका भाजपला पराभवाच्या रूपाने बसला होता. यावेळी पक्ष आपली चूक सुधारेल अशी अपेक्षा सोले यांना होती. मात्र भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली.
या निर्णयाने दुखावलेल्या सोले यांनी आधीच अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे तर, सोले यांच्या गटाकडून भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारी अर्जावर तांत्रिक आक्षेपही घेण्यात आला होता.

गडचिरोली काँग्रेसमधील गटबाजीपासून मनोहर पोरेटींचे अंतर

यामुळे सोले आरपारच्या लढाईच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते.
उद्या, ९ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अनिल सोले हे पक्षाच्या दबावाला बळी पडून अर्ज मागे घेणार की अपक्ष लढून भाजपच्या अडचणी वाढवणार, याकडे संपूर्ण विदर्भाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!