भाजपचा सवाल, पदवीधर निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचे प्रकाशन
Nagpur आमदार फक्त आंदोलनच करणार असतील, तर मतदारांनी अभिजित वंजारी यांना मते कशासाठी द्यायची असा सवाल राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष आणि विद्यमान आमदारांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. आंदोलजिवी आमदाराला मत देण्याची एकदा केलेली चूक पुन्हा करू नका असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी पदवीधरांना केले.
काँग्रेस पक्ष हा आंदोलक पक्ष बनला असून, मुर्दाबाद-जिंदाबादचे नारे लावणे आणि लक्ष वेधून घेणे एवढेच या पक्षाच्या नेत्यांचे काम उरले आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी आपल्या संपूर्ण सहा वर्षांच्या कार्यकाळात पदवीधर, शिक्षक व शैक्षणिक संस्थांच्या कुठल्याही समस्या ना मांडल्या ना सोडवल्या, असा दावा करत त्यांनी 2020 च्या निवडणुकीत मतदारांनी केलेली चूक या निवडणुकीत पुन्हा करू नका, असे आवाहन केले.
भाजप धास्तावली, खाजगी शैक्षणिक संस्थांवर दबाव; शिक्षकांना धमक्या
विधानमंडळात कायदेशीर आयुधांचा वापर करून प्रश्न मार्गी लावणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते, मात्र वंजारी यांनी केवळ भाषणबाजी केली आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली, अशी टीका त्यांनी केली. अनिल सोले यांचे एक वर्ष आणि वंजारी यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील विधान परिषदेचा रेकॉर्ड जाहीर करण्याचे आव्हान देत, माझे म्हणणे खोटे असेल तर वंजारी यांनी ते खोडून काढावे, असे खुले चॅलेंजही बावनकुळे यांनी वंजारी यांना यावेळी दिले.
‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत’; एकनाथ शिंदेंचा वडेट्टीवारांना पलटवार
भाजप हा शब्द पाळणार आणि संकल्प पूर्ण करणारा पक्ष आहे. आम्ही निवडणुकीत जी आश्वासने देतो त्याचा लोखाजोखा सादर करतो. भाजपचे सर्वच आमदार हे करतात. त्यामुळे कोहळे यांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण केली जातीलच, मतदारांनी निश्चिंत राहावे. या जाहीरनाम्यास कोहळे जेवेढे जबाबदार तेवढाच महसूलमंत्री आणि भाजपचा नेता या नात्याने मीसुद्धा राहील. मराठी शाळा बंद पडू दिल्या जाणार नाही. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा येत्या तीन महिन्यांत भरल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी यंत्रणाच निर्माण केली आहे असा दावाही याप्रसंगी बावनकुळे यांनी केला.








