व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा

बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा

सरकारच्या विरोधात आंदोलन, हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी

Buldhana राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये मदत जाहीर केल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडली आहे. ‘राजा उदार झाला आणि पदरी भोपळा आला’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी शासनाच्या निर्णयावर टीका केली. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भोपळा आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. डफडे वाजवून आणि भोपळे फोडून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

दुष्काळामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, या संकटातून सावरण्यासाठी शासनाने किमान हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी दिवाळीसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी आहे. हा निर्णय बळीराजाचा अपमान करणारा असल्याची भूमिका पक्षाने मांडली.

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर ‘५०० कोटी’चा बॉम्ब

शासनाने मदतीच्या निर्णयाचा फेरविचार करून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत द्यावी. तसेच, पीकविम्याची रक्कम त्वरित मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

आठ गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त!

पदाधिकारी, शेतकऱ्यांचा सहभाग
या आंदोलनात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बी. टी. जाधव, युवक जिल्हाध्यक्ष सतीश भुतेकर, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा इंगळे, माजी सभापती लक्ष्मी शेळके, महिला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नाझीमा खान, चिखली विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. ज्योती खेडेकर, बुलढाणा विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. शरद काळे, पीएम जाधव, शंकर महाराज, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सईद इकबाल, सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेश बोंद्रे, जिल्हा प्रवक्ता अमोल भट आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष गजानन भिवसनकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!