व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पदवधीरमध्ये ‘योग्य’ उमेदवार निवडून येणार

पदवधीरमध्ये ‘योग्य’ उमेदवार निवडून येणार

मुख्यमंत्र्यांच्या सावध भूमिकेने उत्सुकता वाढली

Nagpur: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला जोरदार प्रतिसाद मिळाला. निवडणुकीच्या रिंगणातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी आपणच मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

मात्र, मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर थेट भाष्य करणे टाळले. मतदान सुरू असल्याने मी यावर काही बोलणार नाही, मात्र या निवडणुकीत ‘योग्य’ उमेदवार निवडून येईल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी भाजप उमेदवाराचे नाव घेणे किंवा उघडपणे विजयाचा दावा करण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांच्या लेखी नेमका योग्य उमेदवार कोण? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

खुर्चीसाठी मराठा-ओबीसीत आग लावली, वडेट्टीवार बरसले

रवीनगर शासकीय वसाहत येथील दादाजी धुनीवाले मनपा शाळेतील मतदान केंद्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीसारखा उत्साह व रांगा पाहायला मिळत असून, विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह असल्याने सर्व पदवीधर व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी आपणच निवडून येणार असल्याचे माध्यमांना ठामपणे सांगितले. मात्र, एरवी पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा करतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हेच निवडून येतील असा दावा करण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोट्टेहो… उद्या मतदान, आज कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून पडली विकेट!

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, याप्रकरणी शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटले असून स्वतः जरांगे आणि भाजप नेत्यांनीही चौकशीची मागणी केली आहे. सुमारे अडीच वर्षानंतर ही क्लिप अचानक बाहेर आल्याने आम्हालाही प्रश्न पडला असून, कोणाला टार्गेट करण्यासाठी ती बाहेर काढली गेली, याचा छडा लावण्यासाठी या क्लिपची निश्चितपणे फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मुखमंत्र्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!