२१ उमेदवार कमी मतांमुळे शर्यतीतून बाद, इतरांना मिळून अवघी ७ हजार मते
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणी अत्यंत रंजक आणि अटीतटीच्या वळणावर आली आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात पहिल्या पसंतीच्या मतांसाठी मुख्य लढत पाहायला मिळाली असली, तरी विजयाचा आवश्यक कोटा कोणालाही पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्या पारड्यात पडलेली दुसऱ्या पसंतीची मतेच नवा पदवीधर आमदार निश्चित करणार आहेत.
एकूण १ लाख ६५ हजार ९०९ वैध मतांच्या पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ६० हजार ९२४ मते मिळवून आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसचे अभिजित वंजारी ५६ हजार ६३० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या फेरीत अभिजित वंजारी यांनी अनपेक्षित आघाडी घेत भाजपच्या गोटात धाकधूक वाढवली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत सुधाकर कोहळे यांनी सुमारे चार हजारांची आघाडी घेत जोरदार पुनरागमन केले आणि भाजपला मोठा दिलासा दिला.
भाजपच्या गोटात अस्वस्थता, काँग्रेसच्या वंजारींनी घेतली आघाडी
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी तब्बल २४ हजार २४९ मते घेत सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. उर्वरित ३५ उमेदवारांपैकी २१ उमेदवार कमी मतांमुळे शर्यतीतून बाद झाले असून इतरांना मिळून अवघी ७ हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीत विजयाचा कोटा पूर्ण न झाल्याने आता एलिमिनेशन प्रक्रियेसह दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे यांना 56, वंजारी यांना 63 तर कराळे यांना 48 मते पडली आहेत.
शेतकऱ्यांना आधी सक्षम करा, मग विकासाच्या गप्पा मारा! विद्या चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल
कराळे गुरुजी रिंगणात कायम असले तरी ते बाद झाल्यानंतर त्यांच्या २४ हजारांहून अधिक मतदारांनी दुसऱ्या पसंतीचे मत कोणाला दिले आहे, यावरच अंतिम विजय-पराजयाचे गणित अवलंबून असणार आहे. दुसऱ्या पसंतीची मते मिळण्यास सुरुवात झाल्याने भाजपकडे आशेचे वातावरण आहे, तर काँग्रेसकडूनही या मतांवर दावा केला जात आहे. त्यामुळे कराळे गुरुजींची दुसरी पसंती कोणाच्या डोक्यावर विजयाचा मुकुट चढवते, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.








