व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !

जिल्ह्यात विरोधक बॅकफूटवर, मात्र अंतर्गत नाराजीचीही चर्चा; ‘विषय संपला’चा नेमका रोख कोणाकडे?

Washim : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत भाजपने आपले वर्चस्व वाढवले असताना विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षांतर करून आलेल्या काही जणांची अपेक्षित राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांनाही अपेक्षित स्थान आणि संधी मिळत नसल्याची खंत असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ महिला पदाधिकारी जयश्री मधुकर गुट्टे यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय दिला आहे.

गुट्टे यांनी फेसबुकवर, ‘उगाच कोणाला पण भाव देत बसायचं नाही, जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी, विषय संपला,’ अशी पोस्ट शेअर केली आहे. या विधानामागे नेमकी कोणती घटना किंवा भावना आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला नसल्याने त्यांच्या पोस्टच्या संदर्भावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढत असताना पक्षात नव्याने दाखल झालेले नेते आणि सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते यांच्यातील अपेक्षा, संधी आणि स्थान यांचा मुद्दा चर्चेत असतो. पक्षविस्ताराच्या प्रक्रियेत नव्या चेहऱ्यांना महत्त्व मिळत असताना जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल कितपत घेतली जाते, हा प्रश्नही अधूनमधून उपस्थित होतो. मात्र, गुट्टे यांच्या पोस्टचा याच घडामोडींशी संबंध आहे, असे निश्चित झालेले नाही असे ही सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांवर निर्बंध लादले जात आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नका !

राजकीय वर्तुळात सोशल मीडियावरील एखाद्या विधानातून नाराजीचे संकेत शोधले जात असतात. गुट्टे यांच्या पोस्टमुळेही अशाच चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानाचा रोख एखाद्या व्यक्तीकडे आहे, पक्षांतर्गत घडामोडींकडे आहे की एखाद्या वैयक्तिक अनुभवातून ही पोस्ट करण्यात आली, सध्या स्पष्टता नाही. पण तर्क वितर्क मात्र सुरू आहेत.

दुष्काळग्रस्त महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या डॉ. फौजिया खान यांची सरकारकडे मागणी

त्यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे. ‘विषय संपला’ खरा; पण नेमका कोणता विषय? गुट्टे यांच्या या पोस्टमागील नेमकी भूमिका काय आहे, हे त्मात्र नंतरच स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!