व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावती शिक्षक मतदारसंघात २० उमेदवारांची अनामत जप्त

अमरावती शिक्षक मतदारसंघात २० उमेदवारांची अनामत जप्त

पाच उमेदवारांना एक अंकी मते; २६ पैकी केवळ सहा जणांनाच अनामत रक्कम परत मिळण्याची संधी

Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीची हौस अनेकांना महागात पडली. एकूण २६ उमेदवारांपैकी तब्बल २० उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. विशेष म्हणजे, पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत अनेक उमेदवारांची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला १० शिक्षकांच्या सह्या आवश्यक होत्या. मात्र, पाच उमेदवारांना एक अंकी मते मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले. यातील काही उमेदवारांना त्यांच्या सूचक आणि अनुमोदकांकडूनही प्रथम पसंतीची मते मिळाली नसल्याचे चित्र आहे.

अनामत रक्कम वाचविण्यासाठी २,६८९ मतांची गरज

निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना १० हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागली होती. या निवडणुकीत विजयासाठी १६,१३३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. अनामत रक्कम वाचविण्यासाठी उमेदवाराला किमान २,६८९ मते मिळविणे आवश्यक होते. मात्र, २६ पैकी २० उमेदवारांना हा आकडा गाठता आला नाही.

अचलपूरच्या विकासावरून कडू-तायडे यांच्यात जुंपली; भाजपच्या मुरली माकोडे यांचीही मैदानात उडी!

विजयी उमेदवारासह सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पहिल्या सहा उमेदवारांना नियमानुसार अनामत रक्कम परत मिळण्यासाठी दावा करता येईल.

सरनाईकांसह सहा उमेदवारांना दिलासा

अनामत रक्कम परत मिळविण्याची संधी असलेल्या सहा उमेदवारांमध्ये विजयी शिवसेनेचे किरण सरनाईक (१६,६६३ मते), काँग्रेसच्या अदिती पोहरे (८,६३६), शिवसेनेचे बंडखोर प्रा. श्रीकांत देशपांडे (७,०१७), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश देवकर (४,६९८), विमाशिचे प्रा. दिलीप कडू (३,६६९) आणि अपक्ष दत्तात्रय लहाने (२,७१२) यांचा समावेश आहे.

अकोट बाजार समितीत कोट्यवधींच्या अनियमिततेचा संशय!

पाच उमेदवारांना एक अंकी मते

या निवडणुकीत रामदास कड यांना पाच, श्रीकृष्ण पहुरकर, प्रा. मिलिंद ब्राम्हणे आणि अशोक हिवाळे यांना प्रत्येकी सहा, तर हेमलता मुनोत (देवडा) यांना सात मते मिळाली. या पाचही उमेदवारांना एक अंकी मतांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, काही उमेदवारांचे सूचक आणि अनुमोदक यांनी प्रथम पसंतीऐवजी अन्य पसंतीचे मत दिले असावे किंवा त्यांची मते अवैध ठरली असावीत, असा दावा केला जाऊ शकतो. मात्र, या शक्यतांमुळे निवडणुकीतील अत्यल्प मतांची चर्चा अधिक रंगण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!