व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण व्हिडिओ शूटिंगवरून महासभेत गदारोळ; अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेते १५ दिवसांसाठी निलंबित!

व्हिडिओ शूटिंगवरून महासभेत गदारोळ; अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेते १५ दिवसांसाठी निलंबित!

स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा आक्षेप; महापौर शारदा खेडकर यांचे कारवाईचे निर्देश

Akola महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोबाइलद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभागृहात व्हिडिओ शूटिंग केल्याचा आक्षेप घेत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर शारदा खेडकर यांनी विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली. महापालिका सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्षातील नगरसेवकाकडून मोबाइलद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावर सत्ताधारी भाजपच्या बाकांवरून आक्षेप नोंदविण्यात आला.

स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी या प्रकाराकडे महापौरांचे लक्ष वेधत सभागृहातील नियम आणि शिस्तीचा भंग होत असल्याचे सांगितले. संबंधित नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठी जुळवाजुळव; संजय देशमुखांची खेळी यशस्वी!

या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. व्हिडिओ शूटिंगचा विषय केवळ नियमांच्या उल्लंघनापुरता मर्यादित न राहता दोन्ही गटांमधील प्रतिष्ठेचा मुद्दा बनला. आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांना प्रत्युत्तर देण्याच्या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर शेतकरी ठाम; आष्टीत महामार्ग रोखून सरकारला थेट आव्हान!

दरम्यान, महापौर शारदा खेडकर यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील संघर्ष अधिक तीव्र झाला.

error: Content is protected !!