व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण आर्वी बाजार समितीत राजकीय कलगीतुरा रंगला! आरोपांच्या फैरी मुळे राजकारण तापले

आर्वी बाजार समितीत राजकीय कलगीतुरा रंगला! आरोपांच्या फैरी मुळे राजकारण तापले

वानखेडे यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, काळे म्हणतात बदनामी सहन केली जाणार नाही !

 

Wardha : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, आरोप – प्रत्यारोपांच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. उपसभापती प्रशांत वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी सभापतींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सभापती संदीप काळे यांनी या आरोपांचे खंडन केले. बाजार समितीचे सर्व कामकाज नियमानुसार सुरू असून, संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बाजार समितीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले कॉम्प्लेक्स पूर्णपणे नियमांच्या चौकटीत असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. सम्राट लॉन परिसरात जागेची मर्यादा असल्याने तेथे बंदिस्त शेड उभारणे शक्य नव्हते. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उलट उपसभापती वानखेडे यांनी सहकार क्षेत्रातील संस्थांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन; अखेर आंदोलन मागे

 

भाजपचे सक्रिय सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या धनंजय दानवे यांना लिहिलेले पत्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांपर्यंत कसे पोहोचले, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही सभापती काळे यांनी दिली. त्यामुळे बाजार समितीतील वादाला पक्षांतर्गत राजकारणाचीही किनार मिळाल्याचे दिसत आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्याविरोधात आर्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेणार असल्याचे संदीप काळे यांनी स्पष्ट केले. गाते यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशांत वानखेडे यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी जिल्हाध्यक्षांकडे केली. सहकार क्षेत्र हे शेतकरी, कामगार, अडते, हमाल आणि मजुरांना न्याय देण्यासाठी असावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. यावेळी शोभा काळे, लखन अग्रवाल, गंगाधर काळे यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

निमंत्रित-नामनिर्देशित सदस्याची ‘नियोजन’ मोहीम फत्ते; पुढचे राजकीय गणित काय?

एकूणच, आर्वी बाजार समितीतील वाद आता केवळ प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याला राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उपसभापतींच्या आरोपांनंतर सभापतींनी दिलेले प्रत्युत्तर आणि भाजपमधील अंतर्गत घडामोडींमुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

_____

 

error: Content is protected !!