व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘गोकुळ’मध्ये महायुतीकडून सत्ताचोरीचा डाव; वडेट्टीवारांचा घणाघात

‘गोकुळ’मध्ये महायुतीकडून सत्ताचोरीचा डाव; वडेट्टीवारांचा घणाघात

बहुमताचा खेळ बिघडवण्याचा कुटिल डाव असल्याची टीका

Nagpur गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी काँग्रेस आमनेसामने आले असून, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सत्ताचोरीचा गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

दूध उत्पादक शेतकरी व सभासदांनी निवडणुकीत स्पष्ट कौल दिल्यानंतरही, सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवणे, त्यांना परराज्यात घेऊन जाणे आणि बहुमताचा खेळ बिघडवण्याचे कुटिल डाव आखले जात आहेत.

नागपूरच्या सुनिता गावंडे महाराष्ट्राच्या प्रभारी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट करावे की संचालकांना बाहेर का नेण्यात आले, १० नोव्हेंबरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व संचालकांना उपस्थित राहू द्या आणि बहुमताच्या आधारेच अध्यक्ष निवडू द्या. मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा थेट अपमान आहे, असा आरोप डेट्टीवार यांनी केला.
गोकुळच्या या लढाईत काँग्रेस पूर्ण ताकदीने सतेज पाटील यांच्या पाठीशी उभी आहे. सभासदांच्या कौलाचा अनादर आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.

मस्करी सुरू होती, आमचे नाते भावा-बहिणीसारखेच, दोन्ही खासदारांचे स्पष्टीकरण

हा केवळ एका दूध संघाचा प्रश्न नसून संपूर्ण सहकार क्षेत्राची स्वायत्तता आणि लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले, स्वतः सत्तेत बसून अराजकता माजवणारे आणि लोकशाहीची हत्या करणारे आता लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहेत. हा तर निव्वळ रावणांचा मोर्चा’ आहे असा आरपही वडेट्टीवार यांनी केला.

 

error: Content is protected !!