व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण कामांचे श्रेय घेताना भाजपच्या पुढे, अडथळे आले की भाजपवरच आरोप

कामांचे श्रेय घेताना भाजपच्या पुढे, अडथळे आले की भाजपवरच आरोप

भाजपच्या पाठिंब्यावर आमदारकी मिळवली; ठाकरेंच्या आमदारावर टीका

Akola बाळापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या श्रेयवादावरून भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष्य केले आहे. विकासकामे मंजूर झाली की त्याचे श्रेय स्वतःकडे घ्यायचे आणि एखादे काम रद्द झाले किंवा निधी अन्यत्र वळविण्यात आला की त्यासाठी भाजपला जबाबदार धरायचे, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाकडून घेतली जात असल्याचा आरोप भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनिष गावंडे यांनी केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या पाठिंब्यावर आमदारकी मिळविली. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य केले. मात्र, राजकीय समीकरणे बदलल्यानंतर त्याच भाजपवर आरोप केले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे गावंडे यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारमधील मंत्र्यांकडे पाठपुरावा, मंजुरीनंतर स्वतःच्या प्रयत्नांचा दावा!

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार असताना बाळापूर मतदारसंघातील विकासकामांसाठी याच सरकारमधील मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जातो. शासनस्तरावर प्रस्ताव सादर करून कामांना मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे श्रेय स्वतःच्या प्रयत्नांना दिले जाते. दुसरीकडे, एखाद्या कामात प्रशासकीय अडचण निर्माण झाली किंवा निधी वितरणाबाबत बदल झाला की त्यासाठी भाजप सरकारला जबाबदार धरले जाते. ही भूमिका नेमकी कोणत्या राजकीय तत्त्वावर आधारित आहे, असा सवाल गावंडे यांनी उपस्थित केला.

खासदार बोंडेंनी नाकारला ‘लहान भावाचा’ सल्ला?

विकासकामांचा हिशेब जनतेसमोर मांडा!

विकासकामांना मंजुरी मिळण्याची प्रक्रिया विविध शासकीय विभाग, प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतुदींवर अवलंबून असते. त्यामुळे कोणत्या कामासाठी कोणी पाठपुरावा केला, कोणत्या विभागाने मंजुरी दिली, शासन निर्णय कधी झाला आणि निधी वितरणाबाबत काय निर्णय घेण्यात आला, याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, असे गावंडे यांनी म्हटले आहे.

केवळ प्रसिद्धीपत्रके काढून किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोप करून विकासकामांचे श्रेय घेता येणार नाही. जनतेला आश्वासने आणि आरोपांपेक्षा विकासकामांचा स्पष्ट हिशेब हवा आहे. काम मंजूर झाले तर स्वतःचे श्रेय आणि काम रखडले किंवा रद्द झाले तर भाजपवर आरोप, अशी सोयीस्कर भूमिका घेणे योग्य नाही. विकासकामांचे श्रेय घेण्याबरोबरच त्यातील अडचणींची जबाबदारी स्वीकारण्याचेही धैर्य लोकप्रतिनिधींनी दाखवावे, असे आवाहन गावंडे यांनी केले.

मिनी मंत्रालयासाठी अकोल्यात राजकीय हालचालींना वेग, वंचितला रोखण्यासाठी विरोधकांची रणनीती

बाळापूरची जनता सुज्ञ असून, कोण विकासकामांसाठी प्रयत्न करतो आणि कोण केवळ राजकीय श्रेयवादाचे राजकारण करतो, हे तिला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे राजकीय सोयीनुसार भूमिका बदलून भाजपला लक्ष्य करण्याचे प्रयत्न फार काळ चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

error: Content is protected !!