Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार

 

The Election Commission will respond to Rahul Gandhi’s allegations : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गहाळ मतदारांच्या संख्येवर आक्षेप

New Delhi गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालावर विविध माध्यमातून संशय व्यक्त करीत आहेत. आज त्यांनी नवा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात गहाळ मतदारांची संख्या ही मतदारयादीत जोडण्यात आलेल्या मतदारांपेक्षा अधिक आहे, असाअसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यावर महायुती सरकारने आक्रमक पवित्रा घेतला. पण आता निवडणूक आयोगच राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपांची दखल घेतली आहे. या आरोपांचे सविस्तर उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडीयामध्ये राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे व खासदार संजय राऊत यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

Finally the election will be held : निवडणुकीचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून सहा महिन्यांची डेडलाईन!

२०१९ ची लोकसभेची निवडणूक व २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ३२ लाख मतदारांची भर पडली. परंतु २०२४ ची लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पाच महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यांच्या काळात तब्बल ३९ लाख मतदारांची भर पडली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जितके मतदार आहेत. तितके महाराष्ट्रात या पाच महिन्यात जोडण्यात आले आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

हे नवीन मतदार कुठून आले, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी उपयोगात आणल्या गेलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विरोधी राहुल गांधी यांनी केली.

Nitesh Rane : राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत म्हणजे ‘थ्री ईडीयट्स’ !

यापूर्वी राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ३९ लाख मतदार महराष्ट्रात वाढले. महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९ कोटी ५४ लाख असताना ही संख्या ९ कोटी ७२ लाख कशी झाली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

लोकांच्या मनात संभ्रम असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम ऐवजी आता मतपत्रिकेवर मतदान घ्यावे. यासाठी महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.