Anti-national punishments are being given in madrasas in Bengal : भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचा दावा
Nagpur : भाजप नेते नितेश राणे यांनी मदरशांबाबत गंभीर विधाने केलेली आहेत. यासंदर्भात भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, यासंदर्भात गुप्तहेर यंत्रणा काम करत आहे. मी नितेश राणे यांच्या सर्व आरोपांचे समर्थन करत नाही. काही मदरसे चांगले असतीलही. मी बंगालमध्ये राहिलेलो आहे. तेथील मदारशांमध्ये देश विरोधी शिक्षा दिली जाते हे मला माहित आहे.
आज (१३ फेब्रुवारी) नागपुरात आले असता, विजयवर्गीय पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीत जय पराजय होत असतो. मात्र त्याला सहन करण्याची करण्याची ताकद असली पाहिजे. हारल्यावर ते ईव्हीएमवर दोष देतात. निवडणूक जिंकल्यावर मात्र त्यांच्यासाठी सर्व चांगलं असतं.
Pankaja Munde : छगन भुजबळांशी जवळीक कशी? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं !
राजकारण करताना गंभीर राजकीय नेता म्हणून व्यवहार केला पाहिजे. त्या पद्धतीचा काही पुरावा असेल तरच सांगितला पाहिजे. हा जनतेच्या मतांचा अपमान आहे. ज्या बाहेर राज्यातून मतदार आणले, तेव्हा विरोध काय करत होते. त्याचे काही पुरावे असेल तर त्यांनी दाखवावे. केवळ हवेत आरोप करून संविधानिक संस्थांना बदनाम करणे हे काँग्रेसची सवय असल्याचा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला.