Atul Londhe on Manikrao Kokate : शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत होतेच कशी?

 

How dare the minister to call farmers beggars? : कृषीमंत्र्यांच्या विधानानंतर राजकारण पेटले

Mumbai कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या पिक विम्याबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार राजकारण पेटले आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ता डोक्यात गेली आहे, असा आरोप केला. त्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Manikrao Kokate : आता प्रत्येक विभागात ‘कृषी मंत्री कक्ष’!

 

“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. माणिकराव कोकाटे व भाजपा युती सरकारवर तोफ डागली. शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते. स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत कशी होते?, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा सावल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे अतुल लोंढे म्हणाले.

MPCC-Wadettiwar-Sapkal-Congress- Delhi : मजबुरी का नाम हर्षवर्धन सपकाळ?

काय म्हणाले कोकाटे?
‘आजकाल भिकार्याला सुद्धा एक रुपये भिकेत कुणी देत नाही. आम्ही तर एक रुपयात पीक विमा देत आहोत. यामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांनी अर्ज भरल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. यासाठी या योजनेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे विधान त्यांनी केले आहे, असं कोकाटे म्हणाले आहेत.