व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Crime in Nagpur : पाळत ठेवली तेव्हा कळले तो दोन मुलांचा बाप...

Crime in Nagpur : पाळत ठेवली तेव्हा कळले तो दोन मुलांचा बाप आहे!

A father of two children sexually assaulted a woman : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

Nagpur रेल्वे अधिकाऱ्याने अविवाहित असल्याचे सांगून एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. विवाहित असल्याचे सत्य उघडकीस येताच महिलेने पोलिसांत लेखी तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरुन रेल्वे अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शैलेंद्र कुमार (४३, खैरी, कामठी) असे आरोपीचे नाव आहे.

शैलेंद्र कुमार हा रेल्वेमध्ये अधिकारी आहे. त्याची ऑगस्ट २०२१ मध्ये दत्तवाडीत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेशी ओळखी झाली. त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्याने तिला मदत करण्याचे आमिष दाखवून मैत्री केली. शैलेंद्रने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला अविवाहित असल्याचे सांगितले. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले.

त्यामुळे त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नास होकार दिला. तो महिलेच्या घरी जायला लागला. तिला शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला. मात्र, महिलेने त्याला वारंवार नकार दिला. त्यामुळे त्याने महिनाभरात लग्न करण्याचे आमिष महिलेला दाखवले. महिला त्याच्या आमिषावर भाळली.

Dr. Pankaj Bhoyar : लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची

ऑगस्ट २०२१ पासून शैलेंद्र लैंगिक अत्याचार करायला लागला. शैलेंद्र तिला बाहेरगावी नेऊन शारीरिक शोषण करीत होता. शैलेंद्र कुमार हा रेल्वेत अधिकारी असल्यामुळे तो नेहमी ड्युटीवर जात असल्याचे सांगून आपल्या कुटुंबियांना भेटायला जात होता. त्यामुळे महिलेला संशय आला. तिने शैलेंद्रवर पाळत ठेवली. तो महिलेच्या घरी आला. रात्रभर थांबल्यानंतर ड्युटीवर जात असल्याचे सांगून निघून गेला. मात्र, महिलेने त्याचा पाठलाग केला. तो थेट खैरी येथील स्वत:च्या घरी गेला. तेथे तो पत्नी व दोन मुलांसह राहत होता. ती महिला तेथून घराकडे परतली.

Mahavitaran : फेब्रुवारीचे वीज बील देणार शॉक ?

महिलेने शैलेंद्र कुमारला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, तो वारंवार वेळ मारुन नेत होता. अखेर त्याची पत्नी व मुलांचे फोटो महिलेने त्याला दाखवले. त्यामुळे तो घाबरला. लग्न न केल्यास बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे शैलेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखवून काही दिवस थांबण्यास सांगितले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी तो महिलेच्या घरी आला. शैलेंद्रने पुन्हा नकार दिला. त्यामुळे संतप्त महिलेने नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले.

error: Content is protected !!