Rekha Gupta will take oath as chief minister : रेखा गुप्ता यांची गटनेतेपदी निवड; गुरुवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
New Delhi दिल्लीत पुन्हा महिला राज सुरू होणार आहे. दिल्ली भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची निवड करण्यात आली. यापूर्वी शीला दीक्षित, आतिशी सिंग व सुषमा स्वराज या महिलांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. मावळत्या मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्यानंतर पुन्हा महिलेच्या हातात राजधानी दिल्लीची सूत्रे आली आहेत.
तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली असून मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दल अनेक कयास लावले जात होते. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवेश वर्मा, विजयेंद्र गुप्ता, विजेंद्र सचदेव यांची नावे चर्चेत होती. परंतु भाजपच्या श्रेष्ठींनी या सर्व नावांवर फुली मारून शालीमार बाग या मतदारसंघातून निवडून आलेल्या वैश्य समाजाच्या गुप्ता यांच्याकडे दिल्लीचे सूत्रे सोपविली आहे.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी दिले चंद्रपूर-गडचिरोलीच्या तरूणांच्या स्वप्नांना पंख !
त्या मूळच्या हरयाणातील जिंद जिल्ह्यातील असून त्या अ. भा. वि. प. च्या कार्यकर्त्या म्हणून राजकीय जीवनात सुरूवात केली. पक्षाचे निरीक्षक माजी ेकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली.
फडणवीस उपस्थित राहणार रेखा गुप्ता यांचा शपथविधी गुरुवार, दि. 20 फेब्रुवारीला ऐतिहासिक रामलीला मैदानावर दुपारी १२ वाजता होणार आहे. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्य तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजेरी लावणार आहेत. याशिवाय विविध राज्यांचे भाजपचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला एनडीएचे मुख्यमंत्री उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे रेखा गुप्ता यांच्या निवडीचे स्वागत केले








