Breaking

Amravati Crime Branch : शेती अवजारे चोरणाऱ्या टोळीला अटक

A gang that stole agricultural implements was arrested : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयितांवर होते लक्ष

Amravati जिल्ह्यात शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

अंकुश गोपाल पारीसे (३२, रा. जवडी, ता. अचलपूर), आकाश विलासराव पारीसे (२६, रा. राजना, पूर्णा), शंकर रमेश बोरवार (३३, रा. जवडी, ता. अचलपूर), विलास गणाजी बोरवार (३०, रा. जवडी, ता. अचलपूर), मजहर खाँ चांद खाँ (२४, रा. कासदपुरा, अचलपूर), अब्दुल गफ्फार शेख मोहम्मद (६१, रा. कासदपुरा, अचलपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

PM Awas Yojana : १९ हजार ८५ लोकांना आज मिळणार हक्काचं घर!

अमरावती ग्रामीण भागात शेती अवजारे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.

दि. २० फेब्रुवारी रोजी सहा. पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अचलपूर परिसरात संशयित हालचालींवर लक्ष ठेवले. संशयितांकडून दोन मोटारसायकलींसह केबल जाळून काढलेला तांब्याचा तार हस्तगत करण्यात आला. चौकशीअंती आरोपींनी विविध गावांमधून शेती अवजारे चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा माल दुल्हा गेट, अचलपूर येथील भंगार दुकानदारांना कमी किमतीत विकल्याची माहिती मिळाली.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींनी सुरू केली Co-operative Society!

३ मोटर पंप मशीन, ४७ स्प्रिंकलर नोझल, ९ प्लास्टिक पाईप, अॅल्युमिनियम तार व केबल जाळून काढलेला तांबा तार, २ मोटारसायकली असा एकूण २ लाख २० हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत १३ गुन्हे उघड झाले असून, त्यात शिरजगाव, सरमसपूरा, परतवाडा, ब्राम्हणवाडा, आसेगाव, चांदूरबाजार, चिखलदरा आणि अचलपूर येथील पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे नोंद आहेत.