Breaking

Vidarbh Farmers : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य

Financial support for cotton and soybean farmers : २८ फेब्रुवारीपर्यंत आधार संमती सादर करण्याची मुदत

Akola खरीप हंगाम २०२३ मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ५,००० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

खरीप २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केली नाही. पण सातबारा उताऱ्यावर पीकाची नोंद आहे, असे खातेदार या योजनेसाठी पात्र ठरतील. वैयक्तिक व सामाईक खातेदार दोघेही या लाभासाठी अर्ज करू शकतात.

Nagpur Police : पोलीस उपनिरीक्षकानेच दिली शेजाऱ्याची सुपारी

पात्र शेतकऱ्यांनी www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषी सहाय्यकांकडून आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, पण सातबाऱ्यावर नोंद आहे, त्यांनी गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा. वनपट्टेधारक खातेदारांनी तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आधार संमती आणि सामाईक खातेदारांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहाय्यकांकडे सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रांचे नमुने कृषी सहाय्यकांकडे उपलब्ध आहेत.

Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!

तुपकर आंदोलनाच्या भूमिकेत

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी ते संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात यात्रा काढणार आहे. त्यांच्या यात्रेचे पडसाद अकोला जिल्ह्यात उमटणार का, याची उत्सुकता लागलेली आहे. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच सभा घेऊन घोषणा केली. यामध्ये विशेषतः हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भाव फरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, शेतीला कंपाउंड आदी मागण्यांचा समावेश आहे.