Youth killed, Tension in the city : आरोपी दोनच दिवसांपूर्वी सुटला कारागृहातून
Amravati शहरातील मसानगंज परिसरात मिरची कांडप केंद्रासमोर रविवारी सायंकाळी युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. परिसरात खळबळ उडाली. आदर्श साहू (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याची हत्या करणारा आरोपी अभिषेक साहू आहे. विशेष म्हणजे, अभिषेक दोनच दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला होता.
कडक पोलिस बंदोबस्तमिरची कांडप केंद्राजवळ आदर्श साहू उभा असताना, अभिषेक साहू एका युवकासोबत दुचाकीवरून आला. काही कळायच्या आतच त्याने आदर्शच्या पोटात चाकूने वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. आदर्शच्या मित्रांनी तातडीने त्याला होंडा अॅक्टिवावर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Chandrashekhar Bawankule : दिव्यांगांच्या घरी १५ वर्षे वीज बील येणार नाही!
आदर्शच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नातेवाईकांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. ज्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपीच्या घरावर हल्ला, परिसरात तणावया घटनेनंतर संतप्त नातेवाईक व समर्थकांनी आरोपी अभिषेक साहूच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे मसानगंज परिसरात तणाव निर्माण झाला. तणाव निवळण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
Harshawardhan Sapkal : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली !
दोन कुटुंबांतील वादात ऑक्टोबर 2024 रोजी आदर्श साहूच्या मावस भावाचा, वैभव पटेरिया याचा काही युवकांनी खून केला होता. त्या हत्येप्रकरणी अभिषेक साहू हा आरोपी होता. आणि त्यामुळे तो कारागृहात होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती. दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचाच हा पुढचा परिणाम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथक गठित करण्यात आले असून, लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.








