Shivsena Thakrey group to play 700 kg colors during Holi : शिवसेना ठाकरे गटातर्फे ‘रंग बरसे;; 700 किलो नैसर्गिक रंगाची होणार उधळण
Jalgaon शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Uddhav Balasaheb Thackeray पक्षाचा रंग हळूहळू उतरतोय. पक्ष फुटल्यापासून पक्षाची वाताहत होत आहे. पण कार्यकर्ते मात्र होळीचा रंग उधळणार आहेत. जळगावमध्ये याचे नियोजन झालेले आहे. तब्बल ७०० किलो नैसर्गिक रंग उधळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.
पक्षाच्या युवासेनेचे मावळे होळीनिमित्त आयोजित केलेल्या ‘रंग बरसे’ कार्यक्रमात रंग उधळणार आहेत. हा कार्यक्रम जळगाव येथे आयोजित केला आहे. दरवर्षी होळीनिमित्त व धुलीवंदनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु जळगाव येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. यात केमिकलचा लोच्या न ठेवता नैसर्गिक रंगात धुलीवंदन खेळली जाणार आहे.
Social Justice Department : यवतमाळात पोहोचली जनकल्याण यात्रा!
यासाठी पुण्याहून 700 किलो पर्यावरणपूर्वक नैसर्गिक रंग मागविण्यात आला आहे. या सह मुंबईहून विविध रंगांचे 70 सिलेंडर, कलर स्प्रे, सी.ओ.टु. कनफत्ती ब्लास्ट मशीन, पेपर ब्लास्ट मागविण्यात आले आहे. या सह पारंपरिक वाद्य, फ्लयिंग डॉल्बी साऊंड सिस्टिमवर होळीचे गाणी आदींची व्यवस्था करण्यात आली. येत्या 14 मार्च रोजी जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉल येथे धुलिवंदनानिमित्त रंग बरसे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सर्व जळगावकर नागरिकांसाठी खुला राहणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे.
Akola Zilla Parishad : अकोला जि.प.चा आरोग्य विभाग राज्यात अव्वल
महिलांची व्यवस्था वेगळी
या कार्यक्रमात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सहकुटुंब सहभागी होणाऱ्या नागरिकांना वेगळी व्यवस्था राहणार आहे. तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या रंग बरसे कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावे असे आवाहन युवासेना तर्फे प्रितम शिंदे, अजय खैरनार व संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.