Vijay Wadettiwar : बीड म्हणजे सापांच्या राजकारणाचं बिळ झालंय !

Congress leader criticizes Beed’s political situation : जो घुसला, तो साप, अजगर, विंचू बनून येतो

मराठवाड्यातील बीड मध्ये मागील काही काळात ज्या काही घडामोडी झाल्या, राजकारण झाले. त्यानंतर हा जिल्हाच बदनाम झाला आहे. बीडच्या सद्यपरिस्थितीवर काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टिका केली आहे. बीड म्हणजे सापांच्या राजकारणाचं बीळ झालंय, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.

यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, बीडमध्ये जो घुसला तो कुणी साप, कुणी अजगर तर कुणी विंचू बनून येतो आणि एकमेकांना चावत असतात. पूर्वी गालगुच्चे घ्यायचे, आता चावे घेतात. अशीच काहीशी बीडची परिस्थिती झालेली आहे. सरकारमधील मंत्री काय करत आहेत, हेच सध्या कळेनासं झालं आहे.

सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. सत्ताधारी ओडी काढून सरकार चालवत आहेत. निवडणुकीत स्वत’:च्या चेहऱ्याला रंग लावला आहे. त्यामुळे जनता बेरंग झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजनावर बंदी आणली जात आहे. त्यांच्या आनंदावर विरजण पडलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना बंद झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahayuti Government : घरकुलाची थट्टा! ४५३ कोटी हवेत, मिळाले १७ कोटी!

उदय सामंत आमच्यासोबत आले तर फायदा होईल..
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, जुन्या कढीला कशाला उत आणत आहात, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला. अशा वावड्यावरून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आता एनसीपीत जाणार आहे, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मी कधी कुणाला भेटलोच नाही. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे. एवढा मी मूर्ख नाही. राहिलं उदय सामंत यांचं, तर ते माझे मित्र आहेत. त्यांना कधी कधी वाटतं की त्यांच्यासोबत मी जावं. म्हणून ते बोलत असतात. दिवस बदलतात कधीतरी ते आमच्यासोबत येतील. आमच्याकडे आले तर त्यांना फायदा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना, ते एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून नाराजी जाणवत आहे. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय, आपण फक्त अंदाज बांधू शकतो. शक्तीपीठ मार्गासाठी मोर्चा होता. त्या ठिकाणी मी होतो. पण कुठल्या अर्थाने ते बोलले, हे मला माहित नाही. या सगळ्या वावड्या होत्या. बदनाम करण्यासाठी सत्ताधारी वावड्या उठवत असतात. कुरघोड्या सुरूच असतात. असे वडेट्टीवार म्हणाले.

नितेश राणेंबद्दल विचारले असता, सोडा ते.. नितेश राणे कोण? ठीक आहे, मंत्री झाले. होळीच्या शुभेच्छा देत असताना व्यवस्थित दिल्या पाहिजे. होळी म्हणजे विविध रंगांची उधळण असते. त्यांनी एकच रंग धरू नये. तुम्ही एक रंग लावाल तर तो एकच रंग शिल्लक राहील. नितेश राणेंच्या सध्याच्या बोलण्यावरून ते रामभरोसे हिंदू हॉटेल आहे, असंच दिसतंय.

Vijay Wadettiwar : परिणय फुकेंकडे पुरावे असतील तर..

पनीरमध्ये भेसळीचा मुद्दा आमदार विक्रम पाचपुते यांनी काल (१२ मार्च) विधानसभेत उपस्थित केला. त्यावर सगळंच भेसळ आहे. हे सरकारच भेसळीचं आहे. गुटखा बंदी असली तरी गुटखा मिळतो. जेथे दारू बंदी असली, तेथे दारू मिळते. या सरकारचं कुठेतरी नियंत्रण आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.