17,000 quintals of cotton arrived in a single day : हिंगणघाट बाजार समितीमध्ये गाठला उच्चांक
Wardha राज्यभरात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ही कापसाचा हब Cotton Hub म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होत असते. यंदाही आतापर्यंत तब्बल साडेनऊ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे. इतकेच नाही, तर १० मार्च रोजी एकाच दिवशी १६ हजार ९५८ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. हा एक नवीन उच्चांक गाठला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी दिली आहे.
हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात सन २०२४-२५ या हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ ११ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला. ४ महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून ९ लाख ४४ हजार ६७२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांनी ७ लाख ७७ हजार ७६९ क्विंटल, तर सीसीआयकडून १ लाख ६६ हजार ९०२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याचे ॲड. कोठारी यांनी सांगितले.
100 Days action plan : कार्यालय सुधारणा मोहिमेत चांगले काम करा
फेब्रुवारी महिन्यात सीसीआयकडून विविध कारणास्तव १५ दिवस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विक्रीशिवाय पर्याय नव्हता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. कारण, खुल्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ७०० पासून ७ हजार २०० पावेतो आहे, तर सीसीआयचे दर ७ हजार ४२१ पासून ७ हजार ७४ पर्यंत आहे.
Maharashtra English School Trustees Association : शाळांचे ७० कोटी सरकारवर उधार!
सीसीआयकडून कापूस विक्रीच्या दृष्टीने ऑनलाइन नोंदणी १५ मार्च २०२५ ही अंतिम तारीख ठेवली, ती वाढवीने गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या उद्देशाने मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक करून ठेवलेला आहे. मार्च महिना सुरू होताच उन्हाचे चटके सुरू झाले आहे. त्यामुळे घरी कापूस साठवणूक करून ठेवणे जोखमीचे झाले आहे. ३१ मार्चला गुढीपाडवा असल्यामुळे बऱ्याच शेतामध्ये मजुराअभावी कापसाची वेचणी जास्त दर देऊन करून घ्यावी लागत आहे.