Breaking

NCP Ajit Pawar : एकेकाळी भुजबळांचे स्वीय सहायक, आता विधानपरिषदेत वर्णी!

Sanjay Khodke nominated for Legislative Council : अजित पवारांनी हुकमी एक्क्याला दिली संधी, पत्नी आहे आमदार

Amravati एकेकाळी छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक म्हणून काम बघितलेले संजय खोडके यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुकमी एक्का टाकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. संजय खोडके हे अजित पवारांचे खंदे कार्यकर्ते समजले जातात. त्यांनी सरकारी नोकरीत असताना तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अमरावती विभागाचे समन्वयक संजय खोडके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवारी दुपारी ते मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी सुलभा खोडके MLA Sulbha Sanjay Khodke या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Ramdas Athavale : झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे!

बीज महामंडळात सरकारी नोकरी करत असताना 2000 साली संजय खोडके यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अभ्यासू वृत्ती आणि संघटनात्मक कौशल्य असल्यामुळे त्यांनी अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला.

2004 मध्ये त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर, अमरावती महापालिकेत काँग्रेससोबत युती करून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळवली. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला अमरावती शहरात दोन महापौर पदे मिळाली.

2017 मध्ये संजय खोडके यांनी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील विजयी झाले. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके यांचा बडनेरा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर, 2017 मध्ये संजय खोडके विधान परिषद निवडणुकीत अपयशी ठरले.

Siddharth Kharat : नागरेंच्या मुलाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे!

2019 मध्ये मात्र खोडके कुटुंबाला पुन्हा चांगले दिवत आसे. सुलभा खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. 2024 मध्ये सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून निवडणूक लढवली. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या विजयामागे संजय खोडके यांच्या रणनीतीची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते.

संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच अमरावतीत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संजय खोडके यांसारखी अभ्यासू आणि तडफदार व्यक्ती विधान परिषदेत जाणे महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी दिली आहे.