After twelve years, Khadakpurna water reached Buldhana : १७७.६६ कोटींची योजना; महाराष्ट्र दिनापासून नियमित पाणीपुरवठा
Buldhana बुलढाणा शहरासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या खडकपूर्णा जलप्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला आहे. तब्बल १७७.६६ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. येळगाव धरण जलशुद्धीकरण केंद्रावर जलपूजन सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे.
बुलढाणा शहराला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत होता. मागील १२ वर्षांपासून ही योजना रखडली होती. आता खडकपूर्णा धरणातील पाणी अखेर बुलढाण्यात पोहोचले आहे. ही योजना पूर्णत्वास आल्यामुळे शहरवासीयांची दररोज पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे.
Tension in Mahal Nagpur : नारेबाजी झाली नसती तर दंगल पेटलीच नसती!
अलीकडेच येळगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे जलपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. ‘बुलढाणा शहराच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दिनापासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे,’ असं संजय गायकवाड म्हणाले.
शहरवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी समस्येवर हे कायमस्वरूपी उत्तर ठरणार आहे. बुलढाणा शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
Teacher transfers : शिक्षकांच्या जिल्हा बदलीमध्ये मोठा गैरव्यवहार !
या प्रसंगी बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना नेते विजय अंभोरे, अॅड. गणेशसिंग राजपूत, शिवसेना तालुकाध्यक्ष धनंजय बारोटे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, महिला शहराध्यक्ष वैशाली ठाकरे, युवासेना महिला शहराध्यक्ष रामेश्वरी चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.