Breaking

Akola Police : Fitness Store मध्ये सापडले १ कोटी १५ लाख!

 

1.5 crore rupees found in Fitness Store : खदान पोलिसांचा छापा; ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त

Akola खदान पोलिस स्टेशन हद्दीतील इन्कम टॅक्स चौकातील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल आणि फिटनेस साहित्य विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी येथे छापा टाकून ५०० रुपयांच्या नोटांचे एकूण ४६ बंडल जप्त केले आहे. त्यामध्ये १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम असल्याचे आढळले.

खदान पोलिस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, न्यू शर्मा ब्रदर्स या दुकानात मोठ्या प्रमाणात अवैध रोख रक्कम ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता, दुकानात दीपक दिनकर घुगे (वय ३०, रा. खिर्डा, ता. मालेगाव, जि. वाशिम) हा आढळून आला

Harshawardhan Sapkal : कोरटकर पळून गेला, आता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा !

 

दीपक घुगे याच्याकडे सदर रोख रकमेचे कोणतेही दस्तऐवज नव्हते. पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम पंचासमक्ष जप्त करून पुढील तपासासाठी नागपूर आयकर विभागाच्या मुख्य आयुक्तांकडे सुपूर्द केली. खदान पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या तपासात आणखी काही मोठे मासे गळाला लागतात का, हे लवकरच कळणार आहे.

Ashwini Vaishnav : रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच अॅक्शन प्लॅन

पोलिसांनी तपास केला असता, ५०० रुपयांच्या ४६ बंडलमध्ये प्रत्येकी २.५० लाख रुपये असून, एकूण रक्कम १ कोटी १५ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. दोन पांढऱ्या कापडी पिशव्यांमध्ये ही रोकड सापडली. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक मनोज केदारे, पीएसआय दिनकर धुरंधर, पोलिस अंमलदार नीलेश खंडारे, विक्रांत अंभोरे आणि रवी काटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.