Demand to hand over Mahabodhi Mahavihar to Buddhists : रामदास आठवले करणार बोधगयात आंदोलन
Buldhana केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले २९ ते ३१ मार्च या कालावधीत बिहारमधील बोधगया येथे आंदोलन करणार आहेत. “महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि १९४९ चा कायदा रद्द करा” या प्रमुख मागणीसाठी त्यांचा लढा असणार आहे.
आठवले स्वतः केंद्रात मंत्री असताना त्यांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे. भाजपवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, असे बोलले जात आहे. डॉ. आठवले यांनी आवाहन केले आहे की, महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देशभरातील RPI कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनतेने एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे. सध्या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनात ४ हिंदू व ४ बौद्ध ट्रस्टी असा नियम आहे. हा नियम रद्द करून सर्व ट्रस्टी बौद्ध धर्मीय असावेत, तसेच बौद्ध विहारांचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धम्मगुरूंनी सांभाळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आंदोलनादरम्यान डॉ. आठवले हे बौद्ध धम्मगुरूंची भेट घेणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांची भेट घेऊन आपली मागणी मांडणार आहेत.
MLA Manoj Kayande : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; अधिकाऱ्यांवर गुन्हे?
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित बुलडाणा जिल्ह्यातील RPI (आठवले गट) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासंदर्भात RPI बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख, पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.








