Prime Minister Narendra Modi said, today we should remember Saint Gulabrao Maharaj of Vidarbha : आज विदर्भातील संत गुलाबराव महाराजांचे स्मरण झाले पाहिजे
Nagpur : माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराचे काम आज आपण सुरू करत आहो. तेव्हा दृष्टीची गोष्ट होणे स्वाभाविक आहे. दृष्टीच दिशा देते. त्यामुळे आपण १०० वर्षांपर्यंत पाहू शकलो पाहिजे, अशी कामना वेदांमध्ये केली गेली आहे. लोकांच्या जिवनातील अंधकार दूर करून माधव नेत्रालय त्यांच्या जिवनात प्रकाश आणत आहे. माधव नेत्रालय म्हणजे आध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे अदभूत विद्यालय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नागपुरातील हिंगणा मार्गावर माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपुजन आज (३० मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, बाह्य दृष्टी आवश्यक आहेच. पण सोबत अंतःदृष्टीही असली पाहिजे. अंतःदृष्टीच्या विषयावर बोलत असताना विदर्भातील संत गुलाबराव महाराजांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हते. तरी त्यांनी पुस्तकं लिहिले. डोळ्यांनी दिसत नसतानाही त्यांनी ग्रंथच्या ग्रंथ कसे लिहीले असतील, हा प्रश्न साहजिकच पडतो. त्यांच्याजवळ दृष्टी नव्हती, पण अंतःदृष्टी होती. ही दृष्टी विवेकातून प्रगट होते. ती व्यक्तीच्या सोबतच समाजालाही शक्ती देते. त्यामुळे आज देशाला दृष्टीसोबतच अंतःदृष्टीचीही गरज आहे.
Narendra Modi : देशातील गरिबांना चांगला उपचार मिळावा, हीच सरकारची नीती !
संतांनी राष्ट्रीय चेतनेला ऊर्जा दिली..
कोणत्याही देशाचे अस्तित्व पिढ्यानपिढ्या त्यांच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबून असते. आपल्या देशाचा इतिहास बघितला तर शेकडो वर्षांची गुलामी, परकीय आक्रमणही भारताची सामाजिक संरचना मिटवू शकले नाही. भारताची चेतना कधीच संपू शकत नाही. कारण कठीणातल्या कठीण काळातही भारतात या चेतनेला जागरूक ठेवणारे नवनवे सामाजिक आंदोलनं होत राहिले.
मध्य काळात संतांनी भक्तीच्या विचारांनी राष्ट्रीय चेतनेला नवी ऊर्जा दिली. संत गुरूनानक, संत कबीरदास, संत तुलसीदास, संत सुरदास, महाराष्टातील संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर अशा थोर संतांनी राष्ट्रीय चेतना त्यांच्या मौलिक विचारांनी जागरूक ठेवली असल्याचे मोदी म्हणाले.
Narendra Modi : पवित्र यज्ञात पुण्य संकल्पाच्या विस्ताराचे साक्षीदार होता आले !
देशातील आंदोलनांनी भेदभावाच्या भींती तोडून लोकांना एकतेच्या सुत्रात बांधले. विवेकानंदांसारखे महान संत झाले. निराशेत डुबलेल्या समाजाला त्यांनी बाहेर काढले. आत्मविश्वासाचा संचार केला. राष्ट्रीय चेतनेला विझू दिले नाही. गुलामीच्या शेवटच्या दशकांमध्ये डॉ. हेडगेवार गुरूजींसारख्या महान लोकांनी नवी ऊर्जा देण्याचे काम केले.
Narendra Modi’s Nagpur Tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या !
राष्ट्रीय चेतनेच्या संवर्धनासाठी जे विचारबीज १०० वर्षांपूर्वी टाकले गेले, ते महान वटवृक्षाच्या रुपात आज जगासमोर आहे. त्यांचे सिद्धांत, आदर्श या वटवृक्षाला नवी उंची देते. लाखो करोडो स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नाही, तर संघाच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवड आहे. हा अक्षयवड आज भारतीय संस्कृतीला राजकीय चेतनेला निरंतर ऊर्जावान करत असल्याचे मौलिक विचार नरेंद्र मोदी यांनी मांडले.








