A battle of creditorship has begun over crop insurance : पिकविम्याचे श्रेय घेण्यासाठी जाधव-तुपकर आमने-सामने
Buldhana जिल्ह्यासह राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना Vidarbha Farmers दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. २५५५ कोटी रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता ही विम्याची रक्कम आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा जिल्ह्यातील नेत्यांनी केला आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपण पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या आंदाेलनामुळे सरकारने विमा मंजूर केल्याचा दावा केला आहे.
राज्यात प्रलंबित पीकविमा, अनुदान, कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या दरांसाठी विविध आंदोलने झाली. काही दिवसांपूर्वीच मुंबईत शेतकऱ्यांनी अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याचे आंदोलन केले होते. या दबावामुळे अखेर सरकारने २८५२ कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे २०२२-२४ हंगामातील नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पिकविमा कंपन्यांनी दीड वर्ष उशीर केल्यामुळे कायद्यानुसार शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह रक्कम मिळाली पाहिजे, असे तुपकर म्हणत आहेत. ‘सरकारने हिस्सा वेळेवर दिला असता तर शेतकऱ्यांना इतका विलंब सहन करावा लागला नसता. सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेण्याआधी व्याजासह रक्कम मिळवून द्यावी,’ असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.
सत्ताधारी आता पीकविम्याचे श्रेय घेत आहेत. पण त्यांनी कधीही सभागृहात या मुद्द्यावर आवाज उठवला नाही. त्यांनी जर वेळेत पाठपुरावा केला असता, तर शेतकऱ्यांना इतका विलंब सहन करावा लागला नसता, असे तुपकर यांनी सांगितले. “पीकविमा मंजूर केला म्हणून उपकार केल्याचे दाखवू नका; त्याऐवजी कर्जमाफी व कापूस-सोयाबीनसाठी भावफरक अनुदान मिळवून द्या!” असं तुपकर म्हणाले आहेत.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी मेट्रो प्रवासातून साधला लोकांसोबत संवाद
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, “ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.” बुलढाणा जिल्ह्यातील १.८३ लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.








