Free surgeries on 499 children : अनेक मुलांच्या आयुष्याला मिळाली कलाटणी
Wardha राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्याच्या कालावधीत १८ वर्षापर्यंतच्या तब्बल ४९९ मुलांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात हृदय शस्त्रक्रिया, दुभंगलेल्या ओठांची आणि टाळूची शस्त्रक्रिया, जन्मत: मोतिबिंदू अशा जवळपास १०४ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
लहान मुलांच्या नियमित तपासणीद्वारे वेळेत योग्य निदान करून तातडीने या शस्त्रक्रिया केल्याने अनेक मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. ० ते १८ वर्ष वयोगटातील जिल्ह्यात लाखो मुले आहेत. त्या मुलांची नियमित तपासणी करून त्यांच्यात आढळणारे व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व आदी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात येतात.
Harshawardhan Sapkal : अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला !
या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून दोनवेळा, तर शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आरोग्य तपासणी केली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत ४९९ मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Gondia Bridge reconstruction : बाघ नदीवरील जीर्ण पुलाचा होणार कायापालट!
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या १०४ शस्त्रक्रियांपैकी ५२ शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत होतो. उर्वरित ५२ शस्त्रक्रियांमध्ये ३१ प्रकारच्या दातांच्या विकारांचा समावेश आहे. या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतात.








